जिवनामध्ये काही घाव
तशेच दिसत राहतात
कापडावरचे ठिगळ जसे
फाटलेल्याची कबुली देतात

--आनंद काळे
सगळे सुविचार हे
फळ्यावरच चांगले दिसतात
आचरणात आणायचं म्हटलं की
डोईजड होऊ लागतात

--आनंद काळे
पाहिली आहेत माणसं मी
खरं आयुष्य जगणारी
समाज गेला चुलीत
असं काहीसं म्हणणारी

--आनंद
पंखातल बळ बघुनच
आता झेप घ्यायचं ठरवलय..
गाठता येनाऱ्या क्षितिजाच्या
दिशेनेच उडायचं ठरवलयं...

-- आनंद
मला तिला छेडायला आवडतं
तिचा लटका राग बघायला आवडतं
ती पण तितकिच लबाड आहे
तिलाही मला हसताना बघायला आवडतं

--आनंद
ओठावर बोट ठेवुनी माझ्या
म्हणे ती "सख्या तु जरा शांत हो
विसर रे लोकांच्या नजरा
या क्षणापुरता फ़क्त तु माझा हो"

--आनंद काळे
मला आठवत ते तुझं लपणं
चेहऱ्यावरचे भाव ओढणीने झाकणं
नाक्याच्या टोकावरुन डोळ्याआड होई पर्यंत
सारखं सारखं मागे वळुन पाहणं

--आनंद काळे
तुला भेटल्यावर सखे
तुझे डोळे बोलके वाटतात
माझ्या नजरा वेड्या मग
त्या अबोल शब्दांना वेचू लागतात

-- आनंद काळे
चुक ना तिची होती
ना चुक माझी होती
चुकून लोकांचा विचार केला हो
आणि पाहिलं तर ह्रुद्याची काच तडकलेली होती
का वेळ ही आज माझ्यावर आली
मी ईतका आवारा कधिच नव्हतो
भाव मनातले मी मांडिले होते
त्या कागदांना आज उधळीत होतो

-- आनंद काळे