सोबत

सखे माझ्यासावे वाट थोडी अवघडच आहे
निमुळती आणि दरी-खोर्‍यांची आहे
पाऊल सांभाळ आणि धर माझा हात,
घाबरू नकोस सोबत माझी आहे

-- आनंद काळे

थेंब

देवा एकाच मागणी
तिची पापणी भरू दे
माझ्या नावाचा एक तरी थेंब
तिच्या नयनी तरु दे..

- आनंद काळे

ओढ़


नकोस
रुसवा धरु तू सखे
मन मनाची ही ओढ़
क्षण क्षणाला आठवण येई
जन्मो जन्मीची ही जोड़ ग

--आनंद काळे

ओळ

मी वही आणि तू शब्द हो
माझ्या कोरया पानात तू लुप्त हो
मी असा दोन ओळीत रमणारा
ओळीत तू या मजसवे कैद हो

--आनंद काळे

अशांत रात

रात अशी ही तंद्रित
पापणिहि बघ लवते आहे
ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे
कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे
-- आनंद काले

अरसिक

प्रेमातल आमच वेड घोड कधी
पाहिजे तस नहालच नाही
माझी प्रेयसी इतकी अरसिक
की तिला कधी लाजता आलच नाही

-- आनंद काळे

पहिली नजर

नजरेला नजर भिडलेली
नजरेतुन नजर चोरलेली
गालावरची लाली तिच्या
हळूच होती वाढलेली

-- आनंद काळे


मन


मन रिते रिते माझे
न आस कसलीही
फक्त विचारांची घाळमेळ
आणि वेळही चुकलेली

-- आनंद काळे

दिंडी

दिंडी चालली पंढारीला
विठ्ठल विठ्ठल बोलायच असत
वाटा आधीच ठरलेल्या असतात,
आपण फक्त चालायच असत
-- आनंद काळे

चारोळी म्हणजे

चारोळी म्हणजे काही नाही
चार ओळींचा घोळ आहे
तुम्हाला आणि मला सोपी वाटली तरी
यात खूप मोठा झोल आहे ;-)

-- आनंद काळे

आई

क्षणात सारे विसरून जाईन
फक्त तुझा सहवास असु दे
हजार चिंतांनी भरले डोके
यावर असाच तुझा हात फिरू दे

--आनंद काळे

सर


सरीवर सर गार पडे अंगावरी
गारवाही हा बघ हलके गुदगुल्या करी
पहिल्या पावसात सखे तुझी साथ न्यारी
आनंदात या बघ सखे पापणीही झाली भारी

-- आनंद काळे

भेट

दिस झाले तशे फार
नाही शब्दांचीही भेट
आज मिठित तु सखे
तरी का दाटु आला तुझा कंठ

-- आनंद काळे

आठवण


कालची
रात्र एकटयानेच जागून काढली
जुण्या आठवणींनी सर भिजत राहिली
डोळा लागला आणि समोर तूच उभी
पहाटेने मग ती खोटि अस्तित्वे पुसून काढली

--आनंद काळे

दोन पाकळ्या

तुझ्या त्या अवखळ अदांची
आज मला आठवण येतेय
गळ्यातली चैन पकडलेल्या
त्या दोन पाकळ्यांची आज आठवण येतेय

--आनंद काळे

उशीर

आजहि तु उशीरा येणार
आजहि माझा जिव कासाविस होणार
लडिवाळिक मग चेहरा करुनी
आजहि तुझा नवाच बहाणा असणार

-- आनंद काळे

विरह


काही माणसे खुप हवीशी वाटतात
घालवलेले प्रत्येक क्षण आठवणीत रुतून बसतात
अचानक वेळेचे आणि काळाचे गणित जुळते
क्षणात नजरेसमोर ती परकी होऊन जातात

-- आनंद काळे

त्रास

असे अनोळखी मी तुझसाठी
परी एक सांगू पाहतो
नकॊ अश्रु ढाळू तु सखे
तो अश्रु गालांना त्रास देऊ पाहतो

-- आनंद काळे
ती एक शांत सांज होती
ती दुर पाठमोरी जात होती
न जाणो पण का कश्याने
सागराची खारी लाट डोळ्यात होती

--आनंद काळे
गालाला तुझ्या रंग लावणे
एक निमित्तच होऊन गेलय़ं
भांगेने नाही, गालाच्या त्या स्पर्शानेच
मन धुंद होऊन गेलयं

-- आनंद
रुपाने तुझ्या सखे
त्या ब्रह्मदेवालाही भाळले
नजर कुणाची लागु नये म्हणुन
त्याने गालावर काळे बोट लावले
मुखवटे लावुन जगण्या~यांची
खरी मजा असते
सरळसोट जगण्या~यांना
फासावरची सजा असते...

--आनंद काळे
वेड्यासारखा वागलो मी
दुस~याला हसवायला
झालो होतो मुर्ख मी
स्वत:लाच फसवायला

--आनंद काळे


तु समोर बसलेली शांत
पण डोळ्यामध्ये खुप प्रश्न दाटलेले
उघड त्या ओठांच्या मऊ पाकळ्या
कळू दे मला तुझं मन गोठलेले

--आनंद काळे
जिवनामध्ये काही घाव
तशेच दिसत राहतात
कापडावरचे ठिगळ जसे
फाटलेल्याची कबुली देतात

--आनंद काळे
सगळे सुविचार हे
फळ्यावरच चांगले दिसतात
आचरणात आणायचं म्हटलं की
डोईजड होऊ लागतात

--आनंद काळे
पाहिली आहेत माणसं मी
खरं आयुष्य जगणारी
समाज गेला चुलीत
असं काहीसं म्हणणारी

--आनंद
पंखातल बळ बघुनच
आता झेप घ्यायचं ठरवलय..
गाठता येनाऱ्या क्षितिजाच्या
दिशेनेच उडायचं ठरवलयं...

-- आनंद
मला तिला छेडायला आवडतं
तिचा लटका राग बघायला आवडतं
ती पण तितकिच लबाड आहे
तिलाही मला हसताना बघायला आवडतं

--आनंद
ओठावर बोट ठेवुनी माझ्या
म्हणे ती "सख्या तु जरा शांत हो
विसर रे लोकांच्या नजरा
या क्षणापुरता फ़क्त तु माझा हो"

--आनंद काळे
मला आठवत ते तुझं लपणं
चेहऱ्यावरचे भाव ओढणीने झाकणं
नाक्याच्या टोकावरुन डोळ्याआड होई पर्यंत
सारखं सारखं मागे वळुन पाहणं

--आनंद काळे
तुला भेटल्यावर सखे
तुझे डोळे बोलके वाटतात
माझ्या नजरा वेड्या मग
त्या अबोल शब्दांना वेचू लागतात

-- आनंद काळे
चुक ना तिची होती
ना चुक माझी होती
चुकून लोकांचा विचार केला हो
आणि पाहिलं तर ह्रुद्याची काच तडकलेली होती
का वेळ ही आज माझ्यावर आली
मी ईतका आवारा कधिच नव्हतो
भाव मनातले मी मांडिले होते
त्या कागदांना आज उधळीत होतो

-- आनंद काळे
ठेच लागली पायाला
तिने मला विव्हळताना पाहीलं
काय सांगु दोस्तहॊ
तिच्या गालावरुन रक्त ओघळत राहीलं
-- आनंद
खुप काही सांगायच होतं
पण तुझा सहवास नव्हता
तूला भिती होती समाजाची
आणी मला एकटेपणा खात होता
-- आनंद
कालचा दिस कसा गेला
नको विचारुस मज सखे
तुझा अबोला होता दिसभर
काल मी जगलोच कुठे
-आनंद काळे
गालावर तिच्या टिचकी मारली
आणि तिचा गाल लाल झाला
नाकावरील राग पाहुन
बंदा हा बेहाल झाला

-- आनंद काळे
कूणीतरी हवं होतं
किनारी माझ्यासवे येनारं
हाथ हातात घेउन
वाळुत रेघोट्या ओढनारं

-- आनंद काळे
प्रत्येका मध्ये एक कवीमन लपलं असतं
त्याला जाग करावं लागतं
चार ओळी जमवण्यासाठी
डोळ्यात कल्पनेला भरवावं लागतं
का कुणास ठाउक
मी असा का वागतो
मित्र विचारती हा कोणाचा परिणाम
मी तिचे नाव सांगतो..
मला तु ना तेव्हा
खुप नटखट वाटतेस
चश्म्यामागील डोळ्यातुन
जेव्हा तु लटका राग दाखवतेस...
चिखलात पडलेले पाखरु
अखेरचा श्वास घेत असलेले
कपड्यांवर डाग पडेल म्हणून
माणसाचे हाथ रोखलेले
गुंतण्यास तुझ्याभोवती मी
सये असाच आतूर होतो
चांदण्यारातीतला चंद्र
मग चांदण्यांशी फितुर होतो
तू जवळी असावीस
आणि चांदणी रात असावी
मी घ्यावे तुला मिठीत
आणि चांदण्यांची बरसात व्हावी
..........................................
वेड लागलय मला
शब्दांबरोबर खेळन्याच
खेळता खेळता स्वत:ला
त्या दोन ओळींमध्ये लपवायच

-- आनंद काळे
वाटायचे मज ब-याचदा
सांगावे तूज सर्व काही
शब्द ओठी जमू लागलेच होते
पण त्या शब्दास आता अर्थ नाही
..................................................
तू नसताना मज सोबती
कसे फुटावे शब्दांना धुमारे
वाटते की सावलीच हरवली
मग शब्दतरी कशी साथ देतिल बिचारे
................................................
ती रात होती केवड्याची
अजूनी मला ते स्मरते आहे
तु लाजलेली तशीच समोर
काळ्या मेघांनी हे आभाळ पुन्हा भरतं आहे
........................................

-- आनंद काळे
काय सांगु तुला सखे
तुझ्या वागण्यात बालिशपणा वाटतो
त्या खट्याळ नजरेनेच
गुदगुल्या झाल्याचा भास होतो
..............................................
काय सांगु तुला सखे
एरवी तु खुप गोड दिसतेस
पण दातात करंगळी दाबुन हसल्यावर
कैरीची आंबट फोड वाटतेस
...............................................
ओठ गुलाबी हे
आणि अंगावरी लाल साज
शिशिराच्या या सकाळी
वाटे उन्ह पडले आज

--आनंद काळे
चांदन्या प्रकाशात सखे
तुला मिठीत घ्यावे वाटते
तुझ्या त्या स्पर्शाने सखे
अंग अंग शहारावेसे वाटते
....................................................
एका नजरे मधेच जेव्हा
तुला ज्याच्यावर विश्वास बसतो
तोच तुझा खरा जोडीदार
आणि तोच तुझा खरा सखा असतो
......................................................
माहित आहे कधी कधी
आपलाच पाय घसरतो
पण लक्षात ठेव
तोल न सांभळनारे आपणच असतो
........................................................
आठवणींमध्ये तुझ्या सखे
भुतकाळात हरवुन जातो
तुझ्याबरोबर घालवलेल्या क्षणांना आठ्वुन
अश्रुंना वाट मोकळी करुन देतो.

-- आनंद


तुज्या ओठाजवळचा तिळ
जिव घायाळ करुन जातो
का अशी लाजुन हसतेस सखे
माज्या ह्रुदयाचा एक ठोका चुकुन जातो..

................................................

सावळी ती तुझी काया
आणि पसरलेला तो सुगंध,
पहाटेच्य त्या गुलाबी प्रहरा
मन होऊन गेले धुंद

..................................................

खुप त्रास होतो मला
जिव कासावीस होऊन जातो
ओळखीचा कुणी समोरुन
जेव्हा ओळख न दाखवता निघुन जातो

..................................................

काही चुका मी केल्या
मला त्या मान्य आहेत
पण तुलाही मी उमगलो नाही
यातही का चुक माझीच आहे?

-- आनंद काळे (तुमचा आनंद)