दोन पाकळ्या

तुझ्या त्या अवखळ अदांची
आज मला आठवण येतेय
गळ्यातली चैन पकडलेल्या
त्या दोन पाकळ्यांची आज आठवण येतेय

--आनंद काळे

उशीर

आजहि तु उशीरा येणार
आजहि माझा जिव कासाविस होणार
लडिवाळिक मग चेहरा करुनी
आजहि तुझा नवाच बहाणा असणार

-- आनंद काळे

विरह


काही माणसे खुप हवीशी वाटतात
घालवलेले प्रत्येक क्षण आठवणीत रुतून बसतात
अचानक वेळेचे आणि काळाचे गणित जुळते
क्षणात नजरेसमोर ती परकी होऊन जातात

-- आनंद काळे

त्रास

असे अनोळखी मी तुझसाठी
परी एक सांगू पाहतो
नकॊ अश्रु ढाळू तु सखे
तो अश्रु गालांना त्रास देऊ पाहतो

-- आनंद काळे
ती एक शांत सांज होती
ती दुर पाठमोरी जात होती
न जाणो पण का कश्याने
सागराची खारी लाट डोळ्यात होती

--आनंद काळे
गालाला तुझ्या रंग लावणे
एक निमित्तच होऊन गेलय़ं
भांगेने नाही, गालाच्या त्या स्पर्शानेच
मन धुंद होऊन गेलयं

-- आनंद
रुपाने तुझ्या सखे
त्या ब्रह्मदेवालाही भाळले
नजर कुणाची लागु नये म्हणुन
त्याने गालावर काळे बोट लावले
मुखवटे लावुन जगण्या~यांची
खरी मजा असते
सरळसोट जगण्या~यांना
फासावरची सजा असते...

--आनंद काळे
वेड्यासारखा वागलो मी
दुस~याला हसवायला
झालो होतो मुर्ख मी
स्वत:लाच फसवायला

--आनंद काळे


तु समोर बसलेली शांत
पण डोळ्यामध्ये खुप प्रश्न दाटलेले
उघड त्या ओठांच्या मऊ पाकळ्या
कळू दे मला तुझं मन गोठलेले

--आनंद काळे