अशांत रात

रात अशी ही तंद्रित
पापणिहि बघ लवते आहे
ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे
कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे
-- आनंद काले

अरसिक

प्रेमातल आमच वेड घोड कधी
पाहिजे तस नहालच नाही
माझी प्रेयसी इतकी अरसिक
की तिला कधी लाजता आलच नाही

-- आनंद काळे

पहिली नजर

नजरेला नजर भिडलेली
नजरेतुन नजर चोरलेली
गालावरची लाली तिच्या
हळूच होती वाढलेली

-- आनंद काळे


मन


मन रिते रिते माझे
न आस कसलीही
फक्त विचारांची घाळमेळ
आणि वेळही चुकलेली

-- आनंद काळे

दिंडी

दिंडी चालली पंढारीला
विठ्ठल विठ्ठल बोलायच असत
वाटा आधीच ठरलेल्या असतात,
आपण फक्त चालायच असत
-- आनंद काळे

चारोळी म्हणजे

चारोळी म्हणजे काही नाही
चार ओळींचा घोळ आहे
तुम्हाला आणि मला सोपी वाटली तरी
यात खूप मोठा झोल आहे ;-)

-- आनंद काळे

आई

क्षणात सारे विसरून जाईन
फक्त तुझा सहवास असु दे
हजार चिंतांनी भरले डोके
यावर असाच तुझा हात फिरू दे

--आनंद काळे

सर


सरीवर सर गार पडे अंगावरी
गारवाही हा बघ हलके गुदगुल्या करी
पहिल्या पावसात सखे तुझी साथ न्यारी
आनंदात या बघ सखे पापणीही झाली भारी

-- आनंद काळे

भेट

दिस झाले तशे फार
नाही शब्दांचीही भेट
आज मिठित तु सखे
तरी का दाटु आला तुझा कंठ

-- आनंद काळे

आठवण


कालची
रात्र एकटयानेच जागून काढली
जुण्या आठवणींनी सर भिजत राहिली
डोळा लागला आणि समोर तूच उभी
पहाटेने मग ती खोटि अस्तित्वे पुसून काढली

--आनंद काळे